कीर्तन विश्व पॉडकास्ट (Kirtan Vishwa Podcast)

Kirtan Vishwa

कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे.  गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे. कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा  यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. विशेषत: तरूण पिढीमध्ये कीर्तनाविषयी आवड आणि जाण रूजविता येईल यासाठी विविध प्रकारच्या कीर्तनांचे पॉडकास्ट प्रदर्शित करण्यात येतील. यामध्ये नारदीय कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, वारकरी कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, रामदासी संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल.

Kirtan Pravachan is a very rich tradition in Maharashtra and the country. The kirtan tradition has contributed immensely to the enrichment of Indian cultural, religious and spiritual life. Over the last hundreds of years, thousands of kirtankars have worked to nurture the cultural, emotional and mental well-being of many generations.
Kirtan is a great way to spread the message of God, country and religion, to educate the youth. Apart from entertainment, kirtan also introduces us to music, dance, literature, art, history, culture and traditions. Kirtan has an extraordinary power to turn human life around. Podcasts of various types of kirtans will be presented to inculcate love and awareness about kirtan, especially among the younger generation. In this Naradiya Kirtan, Rashtriya Kirtan, Warkari Kirtan, Tukdoji Maharaj Sampraday Kirtan, Ramdasi Sampraday Kirtan, Harikatha Kirtan, Dasganu Maharaj Sampraday Kirtan, Scientific Kirtan, other Sampraday Kirtan types will be presented.

read less
HistoryHistory
नरसी मेहत्याची लाडी । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
25-04-2022
नरसी मेहत्याची लाडी । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने नामयोगी ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा हा सुंदर उपदेश. अभिमान, अहंकार सोडावा असा उपदेश सर्व संतांनी केला आहे. ऐहिक जगातील ज्याचा ज्याचा अभिमान धरावा ते ते सारे नाशिवंत आहे. अभिमान धरायचा तर तो, संनितीचा धरावा असा संदेश स्मिता ताईंनी या कीर्तनाद्वारे दिला आहे. गुर्जर प्रांतातील संत श्री नरसी मेहता यांच्या चरित्रातील एक प्रसंग येथे आख्यानात रंगवला आहे. यातील स्त्री गीतांच्या चाली संगीत जाणकारांनी विशेष पाहण्या सारख्या आहेत. अशा सुंदरसुंदर गीतवैविध्याने नटलेले हे दासगणू सांप्रदायिक कीर्तन स्मिताताईंकडून ऐकुया...
बाल मीराबाई चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
18-04-2022
बाल मीराबाई चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
दासगणू कीर्तन परंपरेमध्ये एक प्रथा अशी आहे की रामकृष्ण हरी असे नमन नं म्हणता रामदास माय माझी असे पद म्हणावे. किंवा उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागेच्या तटी , हे पांडुरंग स्तुतीचे पद म्हणावे. दासगणू महाराज हे साईबाबांचे भक्त होते. त्यामुळे या कीर्तनाच्या मध्यंतरात ' साई रहम नजर करना ' असे पद गायले जाते या सर्व कीर्तन वैशिष्ट्यांसह एक सुंदर दासगणू सांप्रदायिक कीर्तन स्मिताताई आजेगावकर सादर करणार आहेत. मीरा बाईंच्या बालपणीच त्यांनी आपल्या भक्तीची थोरवी, आपल्या आई वडिलांना पटवून दिली. अशा संत मीराबाईंच्या बालपणातील एक प्रसंग यातील आख्यानात रंगवला आहे.
संत कान्होपात्रा चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
28-03-2022
संत कान्होपात्रा चरित्र । ह.भ.प. स्मिताताई आजेगांवकर
भक्ती तीच खरी हारीची॥ दंभा फाटा अद्वेष्टे मन॥ सन्नितिला आचरी॥ हरीची भक्ती तीच खरी॥ भगवदगीतेच्या भक्तीयोग या अध्यायात भगवान गोपाळकृष्णांनी जी भक्ताची लक्षणे सांगितली आहेत त्याचेच जणू हे सुलभ भाषांतर असावे असे हे श्री दासगणू महाराजांचे पद. दासगणू किर्तनपरंपरेच्या कीर्तन सादरीकरणाचा आराखडा हा जरी नारदीय कीर्तनाप्रमाणे असला तरी त्या किर्तनातील बहुतेक पडे ही दासगणू विरचित असावीत हा दंडक आहे. निरुपणाला वेगळा अभंग घेण्यापेक्षा दासगणू महाराजांचेच एखादे पद घ्यावे या नियमाला अनुसरून सौ स्मिता ताई आजेगावकर आपल्या दासगणू कीर्तन पठडीतील कीर्तनातून या भक्तीयोगाचे विवेचन दासगणुंच्या पदा आधारे करणार आहेत. व त्याचबरोबर संत कान्होपात्रांचे दिव्य चरित्र ऐकवणार आहेत.
शक्ती रुपेण् राणी लक्ष्मीबाई | ह.भ.प. मानसीताई बडवे
21-03-2022
शक्ती रुपेण् राणी लक्ष्मीबाई | ह.भ.प. मानसीताई बडवे
भगवती देवी जगदंबेची अनेक रूपे आपणाला माहीत आहेत. कधी अष्टभुजा , कधी दशभुजा, तर कधी शतभूजा अशा अनेक रूपात आपण देवीला पाहतो. पण त्यातील अष्टभुजा हे तिचे रूप अधिक लोकप्रसिद्ध आहे. आठ हातात आठ शस्त्रे घेवुन ती महिषा सुराशी लढली आणि विजयी झाली, तशी प्रत्येकाचं स्त्री विविध नाती निभावत असताना आपल्या दोन हातात अष्टाव धानी आयुधे वापरत परिस्थितीचा सामना करते तेही अष्टभुजेचेच रूप आहे. १८५७ च्या युद्धात साऱ्या बाजुंनी संकट गळ्याशी आलेले असताना राणी लक्ष्मीबाईंनी कशी झुंज दिली ही वीर रसाची कथा मानसी बडवे यांच्या कडून ऐकुया.
मातृ रुपेण् राणी लक्ष्मीबाई । ह.भ.प. मानसीताई बडवे
14-03-2022
मातृ रुपेण् राणी लक्ष्मीबाई । ह.भ.प. मानसीताई बडवे
आपण देवाला मायबाप म्हणतो, माऊली म्हणतो, संतांना व सद्गुरूंना देखील ज्ञानराज माऊली, गुरूराज माऊली असे म्हणतो. त्या मात्रुरुपामध्ये निवास करणाऱ्या देवी भगवतीला मनापासून वंदन करणारं आजचं कीर्तन आहे. राणी लक्ष्मीबाईंचा विवाह झाला, सुखाचा संसार सुरु ही झाला पण दुर्दैवाचा असा फटका बसला ज्या मध्ये तिचा अल्पवयीन मुलगा वारला. या घटनेने नवऱ्याचा धीर खचला पण सारी दुःखे सहन करून ती राज्यकारभाराला उभी राहिली. का? तर या सर्व नागरिक जनांची ती आईच होती म्हणून. हे जे समाज बांधिलकीचे नाते तिने निभावले या मात्रुरुपाचे गुणगान आपण ऐकणार आहोत मानसी ताईंच्या राष्ट्रीय कीर्तनामधून
कन्या रुपेण् राणी लक्ष्मीबाई । ह.भ.प. मानसीताई बडवे
07-03-2022
कन्या रुपेण् राणी लक्ष्मीबाई । ह.भ.प. मानसीताई बडवे
१८ जून १८५८ ला राणी लक्ष्मीना वीरमरण आले. ते हौतात्म्य लक्षात घेऊन तीन भागात राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र आपण ऐकणार आहोत. सप्तशती या ग्रंथामध्ये देवीच्या रूपाचे वर्णन करताना अनेक श्लोक आले आहेत. ' या देवी सर्व भूतेशू कन्या रुपेण संस्थिता | नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः| ' या वर्णनाप्रमाणे जी कन्या दोन्ही कूलांचा उद्धार करते त्या बालिका रूपातील देवीला, कन्या रूपातील देवीला केलेले वंदन या कथेत आहे. राणी लक्ष्मीना तिच्या बालपणीच पार तंत्र्याचे चटके सहन करावे लागले त्यामुळे इंग्रजांशी संघर्ष करण्याचे बीज तिच्या मनात कसे रुजले या विषयी सुंदर कथा या नारदीय कीर्तनात ऐकणार आहोत.
कीर्तने भगवत् प्राप्ती । ह.भ.प. नम्रताताई निमकर
21-02-2022
कीर्तने भगवत् प्राप्ती । ह.भ.प. नम्रताताई निमकर
आपण भगवंताला शोधायला गेलो तर तो वैकुंठामध्ये आपल्याला सापडेलच असे नाही. तडी तापसी हटयोग्यांकडे जावं तर तेथेही नक्की मिळेलच असे नाही. सर्व सोडून दूर जंगलात जावे किंवा हिमालयात निघून जावे तिथेसुद्धा भगवंत भेटातीलच असे नाही. परंतू जेथे भगवंताचे भक्त त्याचे गुणगान गात असतील तेथे भगवंत नक्की सापडतील अशी ग्वाही साक्षात भागावंतांनीच दिली आहे. असा हा कीर्तनाचा महिमा आपल्या नारदीय कीर्तनातून नम्रताताई सांगत आहेत. आणि त्याचबरोबर समर्थ रामदास स्वामींचे चरित्र आख्यान सांगत सांगत हा विषय पूर्ण समजावून देत आहेत की समर्थांना रामदर्शन झाले या मागे त्यांची साधना उपासना आहेच पण त्याच बरोबर या साधनाकाळात त्यांनी ज्या अनेक त्या काळातील किर्तनकारांची विविध कीर्तने ऐकली आणि स्वतःही नाम संकीर्तनात रंगले त्याचाही सहभाग आहे.
देवाची सेवा हीसुद्धा देवभक्तीच । ह.भ.प. नम्रताताई निमकर
03-01-2022
देवाची सेवा हीसुद्धा देवभक्तीच । ह.भ.प. नम्रताताई निमकर
प्रत्येक भक्ताला भगवंताची भेट होण्याची इच्छा असते. भगवंताच्या भेटीमध्येच भक्ताच्या जीवनाचे सार्थक होते. यातसुद्धा भक्ताला भागावंताजवळ जाण्यासाठी दोन गोष्टी सहाय्यभूत आहेत. एक म्हणजे भगावनाम संकीर्तन. भगावनाम संकीर्तनाने देवाची प्राप्ती होणे. आणि दुसरे म्हणजे, आपण देवाच्या कार्यात यथाशक्ती सहभागी होऊन भगवंताचे हृदयात आपल्या संबंधी प्रेम निर्माण होणे. अशाप्रकारे भक्त आणि भगवंत एकरूप झाल्यावर असाच एक मयूर... म्हणजे मोर... प्रभू श्रीरामचंद्रांना सहाय्यभूत झाला. आणि त्यांनी भागावंतकडून काय वरदान प्राप्त केले ? ती कथा आज आपण ऐकणार आहोत. सौ नम्रताताई निमकर आपल्याला, नारदीय कीर्तन परंपरेच्या कीर्तनातून, हे मयूर आख्यान सांगत आहे.
स्वा. सावरकर चरित्र - नाशिक पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
13-12-2021
स्वा. सावरकर चरित्र - नाशिक पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
२८ मे, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. सावरकरांचे समग्र जीवनच तेजस्वी आहे. ते जीवन संक्षेपात मांडणे महाकठीण. तरीही हा प्रयत्न विशेष प्रसंगी आपण करीत आहोत. सावरकर चरित्राच्या पूर्वरंगासाठी समर्थ रामदास स्वामी यांच्या मनोबोधामधील तीन श्लोक घेतले आहेत. रामदास स्वामी हे सोळाव्या शतकातील एक आध्यात्मिक राष्ट्रपुरुष तर सावरकर हे आजच्या काळातील एक प्रभावी राष्ट्रपुरुष. सावरकर चरित्रातील त्यांच्या बालपणातील जडणघडण सांगताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी केव्हा शपथ घेतली ? काय शपथ घेतली ? त्या शपथेचे वैशिष्ट्य काय आणि ती शपथ पूर्ण करण्यासाठी सावरकरांनी कसे प्रयत्न केले ? त्याला कीती यश मिळाले ? याचे सर्व तपशील या कीर्तनात मांडले आहे. सावरकर हे समर्थांच्या श्लोकाप्रमाणे ’जनी जाणता भक्त’ कसे आहेत याचे दर्शन या कीर्तनातून घडवलेले आहे.
श्री नृसिंह जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
06-12-2021
श्री नृसिंह जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम । धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ हे भगवंताचे वचन आहे. ते वचन सार्थ करण्यासाठी देवानी युगायुगात अवतार घेतले आहेत. कधी दशरथ कौसल्येचे पोटी आले तर कधी वासुदेव देवकीच्या पोटी आले. पण नृसिंह अवतार स्तंभातून प्रकटला आहे. आसुरी शक्तीने माजलेल्या हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करुन प्रल्हादासारख्या भक्ताच्या हाती देशाचे राज्य देणारी ती क्रांतिकारी घटना आहे. ज्या कथेद्वारे देवांनी दोन निरोप पाठवले आहेत. प्रल्हादाप्रमाणे निष्ठेने भक्ती कराल तर तुमचे मदतीसाठी येईम. पण आपल्या शक्तीने भक्तांना छळाल तर लोकांचे मनातल्या सहनशीलतेचा स्तंभ फुटेल. नरातला कुणी सिंह पराक्रमी, नृसिंह बनून प्रगटेल आणि आसुरी शक्ती कितीही मोठी असली तरी ती सत्ता संपेलच. असा उभय उपदेश करणारी कथा म्हणजे नृसिंह जन्म.